PhonePe फ्लिपकार्टपासून झाली वेगळी ! अधिवासातही केला बदल!

PhonePe फ्लिपकार्टपासून झाली वेगळी ! अधिवासातही केला बदल!

नवी दिल्ली: दिग्गज पेमेंट प्लॅटफॉर्म कंपनी PhonePe आता फ्लिपकार्टपासून विभक्त झाली आहे. असे असले तरी या दोन्ही कंपन्यांमधील बहुतांश भागभांडवल वॉलमार्ट स्वतःकडेच राखेल. या बदला सोबतच कंपनीने आपले अधिवास स्टेटस ‘सिंगापूर’ बदलून ते ‘भारत’ केले आहे.
ई-कॉमर्स दिग्गज फ्लिपकार्ट आणि पेमेंट लीडर फोनपे यांनी विभक्त होण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि, दोन्ही कंपन्या अजूनही यूएस रिटेल कंपनी वॉलमार्ट अंतर्गत त्यांचे कार्य सुरू ठेवतील. PhonePe प्लॅटफॉर्मला 2016 मध्ये Flipkart ने विकत घेतले. वॉलमार्टच्या नेतृत्वाखालील या व्यवहारात, फ्लिपकार्ट सिंगापूर आणि फोनपे सिंगापूरच्या विद्यमान भागधारकांनी थेट फोनपे इंडियामधील शेअर्स खरेदी केले आहेत, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. यानंतर PhonePe पूर्णपणे भारतीय कंपनी बनेल. या वर्षाच्या सुरुवातीला ही प्रक्रिया सुरू झाली.
या संपूर्ण प्रक्रियेनंतर वॉल-मार्टकडे दोन्ही कंपन्यांमध्ये बहुतांश भागभांडवल असेल. याप्रसंगी बोलताना PhonePe चे संस्थापक आणि CEO समीर निगम म्हणाले की, Flipkart आणि PhonePe हे मोठे भारतीय ब्रँड आहेत. दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या ४० कोटींहून अधिक आहे. आम्ही पुढील वाढीसाठी विमा, संपत्ती व्यवस्थापन आणि कर्ज यांसारख्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करत आहोत.
भारतीय फोनपे
या वर्षी PhonePe ने सिंगापूरहून भारतात आपला अधिवास बदलला. लॉन्च झाल्यापासून, 35 दशलक्षाहून अधिक व्यापारी PhonePe मध्ये सामील झाले आहेत. कंपनी टियर 1, 2, 3 आणि 4 शहरांमध्ये पसरलेली आहे आणि देशातील 99% पिन कोड कव्हर करते.
फ्लिककार्टचे ग्रुप सीईओ कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, “फोनपे स्वतःच्या अधिकारात एक यशस्वी संस्था म्हणून विकसित होताना पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हांला खात्री आहे की PhonePe लाखो भारतीयांना आर्थिक सेवा पुरवण्याचे त्यांचे व्हिजन पुढे नेईल.

CATEGORIES
Share This