About us
“उद्योग वार्ता” या न्युज वेबसाईटवर आपले हार्दिक स्वागत. मराठी पत्रकारितेतील दीर्घ अनुभवातून असे लक्षात आले की मराठी माध्यमात उद्योग-व्यवसाय, आणि आर्थिक विषयाशी निगडित स्वतंत्र नियतकालिकांची कमतरता आहे. याउलट इतर भाषिक माध्यमात, या विषयांची स्वतंत्र नियतकालिके प्रकाशित होतात. शिवाय त्यांच्या ऑनलाइन डिजिटल आवृत्त्या देखील प्रसिद्ध होतात. नेमकी ही उणीव भरून काढण्यासाठी “उद्योग वार्ता” हे मराठी बातम्यांचे ऑनलाइन पोर्टल आम्ही सुरू केले आहे. ही वेबसाईट उद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी, आणि नवनिर्माण करू इच्छिणाऱ्या उदयोन्मुख युवा पिढीच्या पसंतीस उतरेल याची आम्हाला खात्री आहे. यात वाचकांना उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, गॅझेट्स, शेअर बाजार, आधुनिक जीवनशैली, नोकरी-स्वयंरोजगार आणि अर्थ विश्वातील घडामोडींचे प्रतिबिंब दिसेल. शिवाय यशस्वी उद्योजकांचे उद्योजकीय मनोगत आणि प्रथितयश व्यावसायिकांच्या प्रेरणादायी यशकथा देखील वाचायला मिळतील.