एसबीआय क्लर्क प्री परीक्षेचे ऍडमिट कार्ड जारी.
मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने क्लर्क प्रीलिम्स परीक्षा 2022 चे एडमिट कार्ड जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी क्लर्क भरती परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते ऑफिशियल वेबसाइट sbi.co.in वर जाऊन आपले एडमिट कार्ड डाउनलोड करू शकतील.
क्लर्क (जूनियर एसोसिएट) ची प्रीलिम्स परीक्षा १२, १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ होणार आहे.
एसबीआय क्लर्क ऑनलाइन प्रीलिम्स परीक्षेत 100 गुणासाठी ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न समाविष्ट असतील आणि 1 तासाच्या कालावधीत 3 सेक्शन होतील. परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल.
SBI लिपिक प्रवेशपत्र या डायरेक्ट लिंकवर जाऊन देखील डाउनलोड करू शकता
https://ibpsonline.ibps.in/sbijajul22/cloea_oct22/login.php?appid=ec3cc7e8e13849a637dbc5b07a26e466
या स्टेप्स फॉलो करून ऍडमिट कार्ड डाउनलोड करा
स्टेप 1: सर्वात आधी ऑफिशियल वेबसाइट sbi.co.in/careers वर जा.
स्टेप 2: यानंतर वेबसाइटवर रेकरूटमेंट ऑफ ज्युनिअर असोसिएट च्या बाजूच्या कॉल लेटर या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: आता एक पृष्ठ उघडा येथे आपले नंबर/रोल नंबर आणि जन्मतिथि सबमिट करा.
स्टेप 4: तुमचे एडमिट कार्ड स्क्रीनवर येईल.
स्टेप 5: आता चेक करा आणि डाउनलोड करा.
स्टेप 6: परीक्षा हॉल मध्ये घेऊन जाण्यासाठी त्याची प्रिंट घ्या.
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या क्लरिकल कॅडरमध्ये असणाऱ्या क्लर्क भरतीच्या माध्यमातून जुनियर एसोसिएट म्हणजेच क्लर्कची 5008 पदे भरली जातील. एसबीआय क्लर्क पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन प्री परीक्षा आणि मेन परीक्षेद्वारे केली जाईल.