SBI ने ग्राहकांसाठी जारी केला अलर्ट !<br />हे काम कराल तर, होईल मोठे नुकसान.

SBI ने ग्राहकांसाठी जारी केला अलर्ट !
हे काम कराल तर, होईल मोठे नुकसान.

नवी दिल्ली: तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर सावधान. देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना तात्काळ लोन अॅप्सस बाबत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. बँकेने अशा झटपट कर्ज देणार्‍या झटपट कर्ज अॅप्सपासून ग्राहकांना सावध केले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना या अॅप्सबाबत सतर्क केले असून, बँकेने धोका टाळण्यासाठी उपायही सुचवले आहेत. बँकेने म्हटले आहे की, बनावट अॅप्सपासून सावध रहा आणि कोणतीही फसवणूक झाल्यास सायबर क्राइमची तक्रार करा.


बॅंकेने म्हटले आहे की बनावट कर्ज अॅप्सच्या विरोधात अलीकडच्या काळात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्या प्रसारामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या अँपवरूनअनेकांची फसवणूक झाली आहे.
पैसे उधार दिल्यानंतर अशी अॅप्स कर्जदारांचे विविध प्रकारे शोषण करतात. अनेक असहाय लोकांकडून खंडणीही उकळली जात आहे.
अशा प्रकारे तुम्हाला दिलासा मिळेल
सुरक्षा उपायांबद्दल बोलताना, SBI ने सुचवले की अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासणे केव्हाही चांगले.अशी अनेक बेकायदेशीर अॅप्स आहेत जी वापरकर्त्यांना त्यांच्या जाळ्यात अडकवू शकतात आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेऊ शकतात.
हे कधीही करू नका
एसबीआयने म्हटले आहे की, ग्राहकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. बँकेने ग्राहकांना त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अॅपची परवानगी सेटिंग्ज नियमितपणे तपासण्याचा सल्ला दिला आहे. पैशाचे नुकसान किंवा गैरवापर झाल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना द्यावी.

CATEGORIES
Share This