जीडी कॉन्स्टेबल भरती 2022: तब्बल 45,284 रिक्त पदांसाठी उद्या शेवटची तारीख.
नवी दिल्ली: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांसाठी एक संधी चालून आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) CRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.
यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली असून यासाठी उद्या शेवटची तारीख आहे. विशेष म्हणजे रिक्त पदांची संख्या वाढवण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार, SSC कॉन्स्टेबल GD 2022 भरतीच्या रिक्त पदांच्या संख्येत सुमारे 21 हजार पदे वाढवण्यात आली आहेत. आता एकूण 45,284 रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवार ssc.nic.in या वेबसाइटवर अधिक माहिती मिळवू शकतात. भरती परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना CRPF, BSF, CISF, ITBP सारख्या निमलष्करी दलांमध्ये कॉन्स्टेबल GD च्या पदांसाठी भरती केली जाईल.
उमेदवार आता 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत ssc.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ही पात्रता असणं आवश्यक
कर्मचारी निवड आयोगाकडून या भरतीसाठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिवाय उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा 28 ते 23 पर्यंत.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल वय 23 वर्षे असावे. अर्ज फी CRPF कॉन्स्टेबलच्या पदांसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तर, SC, ST आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. सीआरपीएफ कॉन्स्टेबलच्या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रुपये वेतन दिले जाईल.
अशी असेल सिलेक्शन प्रोसेस.
संगणक आधारित परीक्षा (CBE) शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST) वैद्यकीय चाचणी (DME/RME) दस्तऐवज पडताळणी
असा करा अर्ज.
उमेदवारांनी SSC ची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वरील “नवीन वापरकर्ता” लिंकवर क्लिक करून ऑनलाइन नोंदणी करावी. त्यात तुमची सर्व प्राथमिक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, श्रेणी आणि तुमच्या 10वी आणि 12वी परीक्षेचे तपशील, संपर्क तपशील इत्यादी भरून नोंदणी फॉर्म भरा. OTP द्वारे तुमचे संपर्क तपशील सत्यापित करा आणि तुमचे खाते तयार करा. तुमची क्रेडेन्शियल वापरून पोर्टलवर पुन्हा लॉग इन करा “लागू करा” बटणावर क्लिक करा ‘एसएससी अॅप्लिकेशन पेज’ वर, ‘एसएससी जीडी’ टॅबवर क्लिक करा नवीन SSC GD कॉन्स्टेबल अधिसूचना 2022 वर उघडलेल्या पृष्ठावर, “आता अर्ज करा” लिंकवर क्लिक करा. सर्व आवश्यक तपशीलांसह SSC GD 2022 ऑनलाइन अर्ज भरा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा फॉर्म सबमिट करा SSC GD कॉन्स्टेबल 2022 अर्ज शुल्क ऑनलाइन भरा किंवा रोख भरण्यासाठी SBI चलन तयार करा