बनावट औषधांना आळा घालण्यासाठी सरकारचे पाऊल; आता पाकिटांवर बार कोड छापले जाणार !

बनावट औषधांना आळा घालण्यासाठी सरकारचे पाऊल; आता पाकिटांवर बार कोड छापले जाणार !

नवी दिल्ली: औषधांच्या पॅकेजवर बारकोड अनिवार्य करण्याच्या प्रक्रियेला सरकारी पातळीवर अंतिम स्वरूप दिले जात आहे. त्यामुळेऔषधींची पॅकेट स्कॅन करताना उत्पादन परवाना आणि बॅच क्रमांक यासारखी माहिती मिळू शकेल.
बनावट औषधांचा धोका रोखण्यासाठी सरकार औषध कंपन्यांना ३०० प्रकारच्या औषधांच्या फॉर्म्युलेशन पॅकेजवर बार कोड छापणे बंधनकारक करणार आहे. औषधांच्या पॅकेजेसवर बारकोड अनिवार्य करण्याच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. जेणेकरून उत्पादन परवाना आणि बॅच क्रमांक यासारखी माहिती औषधांच्या पॅकेटचे स्कॅनिंग करताना मिळू शकेल. औषध आणि सौंदर्य प्रसाधने नियम 1945 मध्ये दुरुस्ती केल्यानंतर 300 प्रकारच्या औषधांच्या फॉर्म्युलेशन पॅकेजवर बार कोड छापण्याचे नियम पुढील वर्षी मे पासून लागू होणार आहेत.
एका अधिकृत सूत्राने “उद्योग वार्ता” सोबत बोलताना सांगितले की, ज्या 300 औषधांवर बारकोड छापले जाणार आहेत त्यापैकी एक मोठा भाग बहुतेक काउंटरवर खरेदी केला जातो. अशा परिस्थितीत त्यांच्या पाकिटांवर बार कोड छापल्यास बनावट औषधांना आळा बसण्यास मदत होईल. बनावट औषधांचा पुरवठा रोखणे आणि सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा सुनिश्चित करणे हे या दुरुस्तीचे उद्दिष्ट आहे.

CATEGORIES
Share This