परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा वेग कमी, ऑक्टोबरमध्ये शेअर बाजारातून 1,586 कोटी रुपये काढले.
मुंबई: भारतीय शेअर बाजारात सप्टेंबरच्या तुलनेत ओक्टॉबर मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा कमी केला. ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून १५८६ कोटी रुपये काढले आहेत. सप्टेंबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 7600 रुपये काढले होते.
शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत चढ-उतार होतच असतात. सप्टेंबरमध्ये 7,600 कोटी रुपयांच्या मोठ्या विक्रीनंतर, ऑक्टोबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीत घट झाली आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात 1,586 कोटी रुपयांची विक्री केली.
याआधी ऑगस्ट आणि जुलै महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) भारतीय बाजारपेठेत निव्वळ खरेदीदार होते. परदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये 51,200 कोटी रुपये आणि जुलैमध्ये सुमारे 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात केली होती. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 1,70,375 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक विकली गेली आहे.
एफपीआयकडून गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये मोठी गुंतवणूक
गेल्या काही दिवसांपासून परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारांबद्दल खूप उत्साही दिसत आहेत. गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये, FPIs ने भारतीय शेअर बाजारात सुमारे 6,000 कोटींची गुंतवणूक केली आहे.
भारतीय शेअर बाजारातील कामगिरी
गेल्या आठवड्यापर्यंत, मजबूत जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजाराने सकारात्मक परतावा दिला आहे. या कालावधीत, शीर्ष 10 मधील 9 कंपन्यांनी त्यांच्या बाजार मूल्यांकनात 90,318 कोटी रुपयांहून अधिकची भर घातली आहे. त्याच वेळी, बीएसईचा 30 शेअर्सच्या सेन्सेक्सने 60 हजाराचा टप्पा ओलांडला.
इतर बाजारातही होत आहे विक्री.
भारताबरोबरच फिलीपिन्स आणि तैवान सारख्या इतर बाजारपेठांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केली आहे. अमेरिकेतील वाढत्या व्याजदरामुळे परदेशी गुंतवणूकदार विकसनशील देशांच्या बाजारातून माघार घेत आहेत.