पीएम किसान योजना 12 वा हप्ता: पैसे मिळण्यापूर्वी योजनेत झालेला बदल जाणून घ्या !
नवी दिल्ली: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेअंतर्गत सरकार दर वर्षी शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दोन हजार असे एकूण सहा हजार रुपये देते. दरम्यान आता 12 व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट आले आहे.
देशातील लाखो शेतकरी पीएम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच सरकार 12 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करू शकते. यापूर्वी या योजनेचे पैसे 30 सप्टेंबरपर्यंत येणे अपेक्षित होते, मात्र सध्या 12 वा हप्ता अद्याप देण्यात आलेला नाही. दरम्यान, या योजनेबाबत अनेक अपडेट्स आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लाभार्थींच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण होताच पीएम किसानचे पैसे जारी केले जातील.
सूत्रांच्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक घोषणापत्रही भरावे लागेल. त्याशिवाय पीएम किसानचे पैसे सुटणार नाहीत. दरम्यान, सरकारने या योजनेत मोठा बदल केला आहे. तुम्हाला माहिती आहे का पीएम किसान योजनेत काय अपडेट करण्यात आले आहे!
योजनेत मोठे अपडेट्स
सरकारने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचे स्टेटस तपासण्याचा मार्ग बदलला आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचे स्टेटस जुन्या पद्धतीने तपासणार असाल तर तुमची निराशा होईल.
याआधी शेतकरी त्यांचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्डच्या मदतीने लाभार्थी स्टेटस तपासत असत, तिथे बदल करून आधार कार्डचा वापर बंद करण्यात आला आहे. लाभार्थ्याला त्याचे स्टेट्स जाणून घेण्यासाठी सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. हे काम ऑनलाइन घरी बसून करता येते.
लाभार्थी स्टेटस तपासणे महत्त्वाचे का आहे
पीएम किसानच्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमचे सर्व तपशील तपासू शकता. यामध्ये शेतकरी त्याच्या पीएम किसान खात्याची संपूर्ण माहिती पाहू शकतो. जसे की पीएम किसानचा हप्ता त्याच्या बँक खात्यात आला आहे की नाही. याशिवाय शेतकऱ्याची संपूर्ण माहिती, त्याची केवायसी स्थिती आणि त्याला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत, या सर्व बाबी तेथून मिळू शकतात. जर हप्ता अडकला असेल तर त्याचे कारण काय, त्याची माहिती पीएम किसान लाभार्थी स्टेट्स पाहून देखील कळू शकते.
पीएम किसान स्टेट्स कसे तपासायचे?
★ पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्या.
★ मुख्यपृष्ठावर, पूर्वीच्या कोपऱ्यात तळाशी लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.
★ आता एक नवीन पेज उघडेल.
★ नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.
★ कॅप्चा कोड एंटर करा.
★ यानंतर, तुम्ही Get Data वर क्लिक करताच तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.