SSC CGL परीक्षा 2022: जाणून घ्या भरतीतील बदललेल्या नियमा बाबत !
नवी दिल्ली: कर्मचारी निवड आयोगाने कॉमन ग्रॅज्युएट लेव्हल ( SSC CGL भरती 2022 ) साठी अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. तथापी नोंदणी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना फी भरण्यासाठी 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत अंतिम संधी दिली जाईल.
केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे दरवर्षी विविध प्रकारची भरती केली जाते. यापैकी एक आहे एकत्रित पदवी स्तर भर्ती (SSC CGL) परीक्षा. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात, ज्यांना पूर्व आणि मुख्य परीक्षेला सामोरे जावे लागते. या भरतीमध्ये देशभरातील सर्व राज्यांतील महिला आणि पुरुष उमेदवार आपले नशीब आजमावतात. 2022 मध्ये देखील आयोगाने CGL भरती सुरू केली आहे. या भरतीद्वारे देशातील मोठ्या केंद्रीय कार्यालयांमध्ये 20 हजाराहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळवण्याची संधी मिळणार आहे.
यावेळी कशी बदलली निवड प्रक्रिया?
SSC ने CGL भर्ती 2022 च्या निवड प्रक्रियेत बरेच बदल केले आहेत. वास्तविक, CGL भर्ती 2022 मध्ये, उमेदवारांची निवड फक्त दोन स्तरीय चाचण्यांच्या आधारे करायची आहे, तर पूर्वीच्या CGL भरतींमध्ये उमेदवारांची निवड चार स्तरीय चाचण्यांच्या आधारे केली जात होती. आयोगाने यावेळी एक बदल केला आहे. CGL भर्ती 2022 मध्ये, उमेदवारांची गुणवत्ता यादी फक्त टियर 2 गुणांच्या आधारावर केली जाईल. यापूर्वी जेव्हा निवड प्रक्रिया चार स्तरांची होती, त्या वेळी उमेदवारांची गुणवत्ता यादी टियर 1, टियर 2 आणि टियर 3 गुणांच्या आधारे तयार केली जात होती. CGL भर्ती 2022 च्या निवड प्रक्रियेशी संबंधित संपूर्ण माहिती उमेदवार त्याच्या अधिसूचनेत पाहू शकतात.
परीक्षा आता फक्त दोन टप्प्यांत होणार आहे: टियर-1 आणि टियर-2
टियर 1 फक्त पात्रता स्वरूपाची असेल
टियर-II परीक्षेत गणित (23%) इंग्रजी (35%)
टियर-II परीक्षेतील विभाग 3 फक्त पात्र असेल आणि त्यात दोन मॉड्यूल असतील: संगणक ज्ञान आणि डेटा एंट्री स्पीड टेस्ट.
टियर-2 परीक्षेत 3 विभाग असतील, प्रत्येक विभागात दोन मॉड्यूल असतील.