पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून चिनी लोकांनी तरुणांकडून उकळले पैसे; ईडीच्या छाप्यात 5.85 कोटी रुपये जप्त.
नवी दिल्ली: किपशेअर या चायनीज ऍपच्या माध्यमातून तरुणांना अर्धवेळ जॉबचे आमिष दाखवून पैसे उकळले जात होते. कमावलेल्या पैशाचा वापर क्रिप्टोकरन्सी खरेदीसाठी केला जात होता. ईडीने या प्रकरणी मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू केली आहे.
चीनने भारतातील तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवून करोडो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या छाप्यांनंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. प्रत्यक्षात अशा कंपन्या बेंगळुरूमध्ये कार्यरत असून त्यामागे चीनचा हात आहे. अर्धवेळ नोकरी देण्याचा आमिषाने तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. संचालनालयाच्या छाप्यांमध्ये बेंगळुरूमधील 12 कंपन्यांकडून सुमारे 5.85 कोटी रुपये जप्त करण्यात आले. या कंपन्या निष्पाप तरुणांची फसवणूक करत होत्या.
मोबाईल ऍप कीपशेअरच्या माध्यमातून सुरू होती फसवणूक.
किपशेअर या चायनीज ऍपच्या माध्यमातून तरुणांना अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळले जात होते. ईडीने या प्रकरणी मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू केली आहे. वास्तविक, या प्रकरणी दक्षिण सीईएन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये अर्धवेळ नोकरीसंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणांची अशी करायचे फसवणूक
आपल्या तपासात ईडीच्या लक्षात आले की, चीनच्या लोकांनी भारतात कंपन्या स्थापन केल्या. ज्यामध्ये बहुतेक भारतीयांना संचालक, अनुवादक ( इंग्लिश ते मंडारीन), एचआर व्यवस्थापक आणि टेलिकॉलर म्हणून नियुक्त केले गेले. या भारतीयांच्या तपशीलाच्या आधारे बँकेत खाती तयार केली. आरोपीने कीपशेअर नावाचे मोबाईल ऍप तयार करून व्हॉट्सऍप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून त्याचा प्रचार केला. यामध्ये तरुणांना अर्धवेळ नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. Keepshaer ला एका गुंतवणूक ऍपशी जोडले गेले होते आणि तरुणांनी या ऍपवर नोंदणी करण्यासाठी रक्कम डिपॉझिट केली होती. “तरुणांना सेलिब्रिटींचे व्हिडिओ लाईक करून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याचे काम देण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर, प्रति व्हिडिओ 20 रुपये प्रमाणे कीपशेअरच्या वॉलेटमध्ये जमा केले गेले. ईडीने सांगितले की काही काळ त्याच्या वॉलेटमध्ये पैसे जमा करण्यात आले पण नंतर हे ऍप प्लेस्टोअरवरून काढून टाकण्यात आले. अशा प्रकारे लोकांची फसवणूक होत होती. हे पैसे बेंगळुरूतील कंपन्यांच्या बँक खात्यातून क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केले गेले. यानंतर ते चीनच्या क्रिप्टो एक्सचेंजपर्यंत पोहोचायचे. हे सर्व काम चीनमधील काही लोकांच्या देखरेखीखाली फोन आणि व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून केले जात होते. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातील 92 आरोपींपैकी 6 चीनचे आणि बाकीचे तैवानचे आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.