आयआयटी जोधपूर मध्ये 153 शिक्षकेतर पदांसाठी भरती.

आयआयटी जोधपूर मध्ये 153 शिक्षकेतर पदांसाठी भरती.

आयआयटी जोधपूरने विविध विभागांमध्ये 153 शिक्षकेतर पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर असून त्यासाठी पदानुसार  1000/500 रु परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे.

 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) जोधपूरने विविध विभागांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संस्थेने 19 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या भरती जाहिराती नुसार कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ अधीक्षक, अधीक्षक , सॉफ्टवेअर अभियंता, वैद्यकीय अधिकारी, क्रीडा अधिकारी, सहाय्यक अभियंता यांसह इतर एकूण 153 पदांची भरती करण्यात येत आहे.  सर्व पदांची ही नियमित भरती आहे.

 अर्ज प्रक्रिया

 पात्र उमेदवार आयआयटी जोधपूरमधील अशैक्षणिक पदांसाठी संस्थेच्या अधिकृत वेबसाइट iitj.ac.in वर भरती विभागात दिलेल्या लिंकला भेट देऊन थेट लिंकवरून ऑनलाइन अर्ज पृष्ठावर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 19 सप्टेंबरपासून सुरू झाली असून उमेदवार 17 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतील.  अर्जादरम्यानच, उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून रु. 1000/500 (पदांनुसार बदल) परीक्षा शुल्क भरावे लागेल.  SC, ST, दिव्यांग, माजी कर्मचारी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सर्व महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

 पात्रता निकष जाणून घ्या

 कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी IIT जोधपूर अशैक्षणिक भरती 2022 च्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांनी रिक्त पदांच्या विभागातून संबंधित विषयासह BE/B.Tech किंवा B.Sc पदवी उत्तीर्ण केलेली असावी.  तथापि, संबंधित ट्रेडमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.  उमेदवारांचे वय 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे.  शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशील यासारख्या इतर तपशीलांसाठी उमेदवारांनी वेबसाईटवर जाऊन भरती अधिसूचना पहावी.

CATEGORIES
Share This