देशी जुगाड करून मुलांनी बनवली सहा सीटची EV बाईक !<br />ग्रामीण मुलांच्या संशोधनावर आनंद महिंद्रा देखील फिदा !

देशी जुगाड करून मुलांनी बनवली सहा सीटची EV बाईक !
ग्रामीण मुलांच्या संशोधनावर आनंद महिंद्रा देखील फिदा !


मुंबई: सोशल मीडियावर एक जुगाडी बाईकचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. त्यात एक गावाकडचा मुलगा सहा आसनी इलेक्ट्रिक बाइक चालवताना दिसत आहे. ती बाईक त्याने स्वतः बनवली आहे. जेष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही या मुलाच्या देशी जुगाडाला दाद दिली आहे.

ज्येष्ठ उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. खेड्यातील या मुलाच्या कल्पकतेचे त्यांनी कौतुक केले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक खेडूत मुलगा त्याने स्वतः बनवलेल्या सहा आसनी इलेक्टिक बाईकची माहिती देताना दिसत आहे.

तो सांगतो की एका चार्जवर ही बाईक 150KM धावते. ही बाईक तयार करायला 10 ते 12 हजार रुपये खर्च आल्याचे त्याने सांगितले. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बाईक 150 किलोमीटरपर्यंत चालवता येते. ती पूर्णपणे चार्ज करण्यासाठी फक्त 8 ते 10 रुपये खर्च येतो.

ही बाईक जागतिक पातळीवर आणता येईल!
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि त्यांच्या कंपनीचे मुख्य डिझायनर प्रताप बोस यांना टॅग केले.’डिझाईनमध्ये किरकोळ बदल केल्यानंतर ही बाईक जागतिक स्तरावर आणली जाऊ शकते’ असे त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे.
‘ही बाईक युरोपातील गर्दीच्या पर्यटन केंद्रांमध्ये टूर ‘बस’ म्हणून वापरली जाऊ शकते का? असेही त्यांनी विचारले आहे. मी नेहमीच ग्रामीण वाहतूक कल्पकतेचा चाहता आहे असेही त्यानी म्हटले आहे. दरम्यान सोशल मीडियावर देखील हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्स या मुलाचे कौतुक करत आहेत.

CATEGORIES
Share This