या बेंच मार्क इंडेक्समध्ये टाटा मोटर्सची एन्ट्री, डॉ.रेड्डी लॅब होणार बाहेर!
मुंबई: पुढील महिन्यापासून बीएसई निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. टाटा समूहाचा टाटा मोटर्स हा स्टॉक सेन्सेक्समध्ये दाखल होत असून तो डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजची जागा घेईल.
पुढील महिन्यापासून बीएसई निर्देशांकामध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. त्यानुसार डिसेंबरपासून सेन्सेक्समध्ये फार्मा स्टॉक डॉ रेड्डीज लॅबोरेटरीजची (डीआर रेड्डी) जागा टाटा मोटर्स घेईल. या बदलाबाबतची माहिती स्टॉक एक्सचेंज बीएसईने दिली आहे. एशिया निर्देशांकानुसार, 19 डिसेंबरपासून डॉ. रेड्डीज बेंचमार्क निर्देशांकाचा भाग असणार नाही.
हे शेअर्सही होतील सहभागी
एक्सचेंजने बीएसई 100 आणि एस अँड पी बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट 50 निर्देशांकांमध्येही बदल जाहीर केले. यामुळे अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. हे शेअर्स डिलिस्ट केले जातील. त्याच्या जागी अदानी पॉवर लिमिटेड आणि इंडियन हॉटेलचा समावेश केला जाईल. एक्सचेंजने सांगितले की S&P BSE सेन्सेक्स 50 आणि S&P BSE Bankex C निर्देशांकांमध्ये कोणताही बदल होणार नाही.
सेन्सेक्स हा भारतातील सर्वाधिक ट्रॅक केलेला निर्देशांक आहे. BSE वर प्रमुख क्षेत्रांमध्ये सूचीबद्ध असलेल्या 30 सर्वात मोठ्या, सर्वात तरल आणि आर्थिकदृष्ट्या सुदृढ भारतीय कंपन्यांच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी हे डिझाइन केले गेले आहे.