ट्विटरवर आता राजीनाम्याची लाट!<br />मस्क म्हणाले – मला फरक पडत नाही.

ट्विटरवर आता राजीनाम्याची लाट!
मस्क म्हणाले – मला फरक पडत नाही.

नवी दिल्ली: ट्विटर कंपनीचे नवे बॉस अॅलन मस्क यांनी कर्मचाऱ्यांबाबत अतिशय कडक नियम बनवले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने कर्मचारी ट्विटरवरून राजीनामा देत आहेत. गेल्या गुरुवारीही अनेक कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली.
कर्मचार्‍यांच्या सततच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना मस्क म्हणाले कंपनीसोबत चांगले लोक राहत आहेत त्यामुळे मला याचा काहीही फरक पडत नाही. अलीकडे त्याच्यावर बरीच टीका होत आहे, परंतु मस्क या टीकेने विचलित झालेले नाहीत.

अगोदर ट्विटरने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केल्यानंतर आता उर्वरित कर्मचाऱ्यांनी कंपनीचे नवे बॉस इलॉन मस्क यांना धक्का देण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मस्क यांनी कंपनीत काम करण्यासाठी केलेल्या कठोर नियमांमुळे कंपनीचे उर्वरित कर्मचारी फारच नाखूष आहेत. त्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांनी गुरुवारी कंपनीकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर मस्क यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जास्त काळ काम करण्याचे किंवा कंपनी सोडण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता अनेक कर्मचाऱ्यांनीही कंपनी सोडण्यास सुरुवात केली आहे. एका सर्वेक्षणात ४२ टक्के कर्मचारी ट्विटर सोडू इच्छित असल्याचे समोर आले आहे. या सर्वेक्षणात ट्विटरच्या 180 कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. या सर्वेक्षणातील आश्चर्याची बाब म्हणजे केवळ 7 टक्के कर्मचाऱ्यांनी ट्विटरवर काम करण्यात स्वारस्य दाखवले.
कर्मचाऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न
अहवालात असेही म्हटले आहे की मस्क आता ट्विटरवरील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना रोखण्यासाठी वारंवार बैठका घेत आहेत आणि त्यांना कंपनीत थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी, गुरुवारी ट्विटर सोडलेल्या कर्मचार्‍यांमध्ये मोठ्या संख्येने अभियंत्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे, जे अॅपमधील त्रुटी दूर करतात.
निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतल्यानंतर मस्कने ट्विटरच्या ४४०० कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आणि कामाचे नियमही खूप कडक केले आहेत.

CATEGORIES
Share This