राज्यातील पोलिस भरतीचा मार्ग मोकळा; 18 हजार 331 पदे भरणार !

राज्यातील पोलिस भरतीचा मार्ग मोकळा; 18 हजार 331 पदे भरणार !

मुंबई: राज्यात सरकारकडून पोलीस भरती सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक बाबी समोर आल्याने ही भरती पुढे ढकलण्यात आली होती. मात्र तो तांत्रिक अडथळा आता दूर झाला असून पोलीस भरती पूर्वव्रत सुरू झाली आहे. भरती बाबतच्या जाहिराती देखील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात 18 हजार 331 पोलिसांची भरती होणार आहे. यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या पदभतीमध्ये आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
वयोमर्यादा उलटलेल्या उमेदवारांनाही मिळणार संधी!
कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला होता त्या उमेदवारांना या भरतीत संधी मिळेल अथवा नाही याबाबत साशंकता होती. अशा उमेदवारांनी सरकारकडे दादही मागितली होती. त्यामुळेच आता सरकारनं आणि गृहविभागाने मोठा निर्णय घेत अशा उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. असे उमेदवार ज्यांनी कोरोना काळात फॉर्म भरले होते मात्र आता त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. त्यामुळे ते परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. आता अशा उमेदवारांच्या वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांना आता पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे. यामुळे पोलीस भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

CATEGORIES
Share This