दहावी पास युवकांसाठी सरकारी नोकरीची संधी.
हवालदाराच्या चोवीस हजार पदांच्या बंपर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
नवी दिल्ली: स्टाफ सलेक्शन कमिशनने 27 ऑक्टोबर रोजी जीडी कॉन्स्टेबलच्या एकूण 24369 पदासाठीच्या परीक्षेची अधिसूचना जारी करून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण आणि कमाल 23 वर्षे वय असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
विविध सशस्त्र दलांमध्ये (BSF, CRPF, ITBP, CISF, SSB, AR, SSF, NCB) सरकारी नोकरीसाठी इच्छूक असलेल्या आणि एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षेची तयारी करत असलेल्या इच्छुकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने ( एसएससी ) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) मध्ये कॉन्स्टेबल (GD – जनरल ड्यूटी) आणि आसाम रायफल्स (AR) मध्ये SSF आणि रायफलमन (GD – जनरल ड्यूटी) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मध्ये कॉन्स्टेबलच्या एकूण 24369 पदांची भरती केली जात आहे. यासाठी गुरुवारी, 27 ऑक्टोबर 2022 रोजी आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये सर्वाधिक 10,497 रिक्त पदे तर केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 8911 रिक्त पदांची भरती होणार आहे.
कॉन्स्टेबल पदाच्या अर्जासाठी लिंक
https://ssc.nic.in/
एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज सुरू
एसएससी जीडी कॉन्स्टेबल अधिसूचना 2022 जारी झाल्याने, अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. विहित पात्रता असलेले आणि अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर प्रथम मुख्यपृष्ठावर दिलेल्या लॉगिन विभागात नोंदणी करून आणि नंतर नोंदणीकृत तपशीलांसह लॉग इन करून अर्ज सादर करू शकतील. अर्ज करताना 100 रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवार तसेच सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी पात्रता निकष
SSC च्या 24 हजाराहून अधिक GD कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी, केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, ज्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच, त्यांचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उच्च वयोमर्यादा SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे, OBC/भूतपूर्व सैनिकांसाठी 3 वर्षे, शिथिल होईल. तसेच विविध राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि भरतीच्या इतर तपशीलांसाठी भरती जाहिरात पहावी.
शारीरिक चाचणीची मानके (PST)
उमेदवारांना विहित शारीरिक मानके देखील पूर्ण करावी लागतील, जी खालीलप्रमाणे आहेत:-
पुरुष उमेदवारांसाठी उंची – 170 सेमी
महिला उमेदवारांसाठी उंची – 157 सेमी
पुरुष उमेदवारांसाठी छाती – 80 सेमी विस्ताराविना आणि किमान 5 सेमी विस्तार
वजन – भौतिक उंचीनुसार निर्धारित मानकांनुसार.
शारीरिक कार्यक्षमता चाचणीचे मानके (PET)
पुरुष उमेदवारांना 24 मिनिटांत 5 किमी धावणे आणि 6 1/2 मिनिटांत 1.6 किमी धावणे पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, महिला उमेदवारांना 8 1/2 मिनिटांत 1.6 किमी धावणे आणि 4 मिनिटांत 800 मीटर धावणे आवश्यक आहे.