आयटी पदविधारासाठी पुढील वर्षी नोकऱ्यांची धूम

आयटी पदविधारासाठी पुढील वर्षी नोकऱ्यांची धूम

मुंबई: देशातील आयटी क्षेत्रातील पदवीधरांसाठी एक सकारात्मक बातमी समोर येत असून त्यांच्यासाठी आगामी वर्षात नोकऱ्यांची मोठी धूम पाहायला मिळणार आहे. येत्या 2023 च्या पहिल्या तिमाहीत देशातील सर्व मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 1 लाख 5 हजार नोकऱ्या या वर्षात निर्माण होणार आहेत. त्यामुळे फ्रेशर्ससाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. या मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, एचसीएल या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या वर्षीचा हा आकडा 8 हजारांनी जास्त आहे.

जग वाढती महागाई आणि व्याजदरवाढीच्या समस्यांना तोंड देत असताना भारतीय बाजारात मात्र काहीसा विपरीत बदल दिसत आहे. अलीकडे जास्तीत जास्त फ्रेशर्सना नोकरीवर घेऊन त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याकडे मोठ्या कंपन्यांचा कल वाढतोय. त्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणवर नोकर भरती केली जाणार आहे. आगामी वर्षात एचसीएलमध्ये 30 हजार नवीन तरुणांना भरती करून घेतले जाईल. इन्फोसिससारख्या भारतातील आयटी क्षेत्रातील अव्वल कंपनीमध्ये 50 हजार तरुणांना भरती करून घेतले जाणार आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आगामी वर्षात मोठी धूम पाहायला मिळणार आहे.
मागील कोरोना काळात आयटी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या होत्या. नोकऱ्या जाणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त होते, पण आता ही परिस्थिती बदलत असल्याचे दिसत आहे. पुन्हा एकदा या क्षेत्रात गुंतवणुकीचा ओघ वाढायला सुरु झाले आहे याचीच परिणीती या रोजगार वाढीत दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

CATEGORIES
Share This