आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम साठी (टीईएस 49) अधिसूचना जारी.
नवी दिल्ली: भारतीय सैन्याच्या टेक्निकल कॉर्प्समध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. जुलै 2023 मध्ये सुरू होणाऱ्या लष्कराच्या तांत्रिक प्रवेश योजना 49 (TES 10+2) बॅचसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
सैन्यातील टीईएस भरती ही 12 वी नंतर सैन्याच्या तांत्रिक कॉर्प्समध्ये कमिशन्ड ऑफिसर होण्याची संधी देते. भारतीय सैन्याच्या टेक्निकल कॉर्प्समधील पदवीधरांना आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) मधून नियुक्ती मिळते, ज्यासाठी एक वेगळी अधिसूचना जारी केली जाते.
आर्मी टीईएस 49 साठी 15 नोव्हेंबरपासून अर्ज.
उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की जरी आर्मी टेक्निकल एंट्री स्कीम (TES 49) साठी अधिसूचना जारी केली गेली असली तरी, अर्जाची प्रक्रिया एका महिन्यानंतरच सुरू होईल. आर्मी TES 49 अधिसूचनेनुसार, अर्जाची प्रक्रिया 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2022 (दुपारी 3 पर्यंत) आहे. विहित पात्रता असलेले आणि आर्मी TES साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत भर्ती पोर्टलवर, joinindianarmy.nic.in वर नियोजित तारखांना अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रियेचा एक भाग म्हणून, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत तपशीलांद्वारे लॉग इन करून अर्ज सबमिट करावा लागेल.
आर्मी टीईएस ४९ साठी जेईई मेन अनिवार्य.
सैन्याच्या तांत्रिक प्रवेश योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांमध्ये किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त संस्थेतून 10+2 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याव्यतिरिक्त, उमेदवारांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन 2022 मध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच, कट ऑफ तारखेनुसार उमेदवारांचे वय 16 वर्षे 6 महिन्यांपेक्षा कमी आणि 19 वर्षे 6 महिन्यांपेक्षा जास्त नसावे.