सरकारी नोकरी 2022: ऑक्टोबर अखेर पर्यंत हजारो पदांसाठी अर्ज करण्याची संधी.
नवी दिल्ली: केंद्र आणि राज्य सरकारी विभागांमध्ये ऑक्टोबर 2022 मध्ये हजारो पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यूपीएससी, एसएससी, एफसीआय, आदींसह काही राज्य स्तरावरील भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे.
सरकारी नोकरीच्या संधींची वाट पाहणाऱ्या आणि विविध भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या देशभरातील उमेदवारांसाठी ऑक्टोबर 2022 महिन्यात हजारो जागांसाठी संधी चालून आली आहे. दसरा, दिवाळी आणि इतर सणांनी भरलेल्या ऑक्टोबर महिन्यात, उमेदवारांनी केंद्रीय संस्था आणि विविध सेवा निवड मंडळांद्वारे सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करण्यास विसरू नये.
कुठे कुठे सुरू आहे भरती ?
1 ) SSC IMD SA 2022: कर्मचारी निवड आयोगाने हवामान विभागातील 990 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. हवामान खात्यात वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या 990 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात.
2 ) बँक ऑफ बडोदामध्ये 346 सरकारी नोकऱ्यांसाठी 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा बँक ऑफ बडोदाने 30 सप्टेंबरपासून 346 वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड (व्हर्च्युअल आरएम सेल्स हेड) आणि ऑपरेशन्स हेड – वेल्थ यांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे. या भरतीची अधिसूचना आणि अर्जाची लिंक. bankofbaroda.in
3 ) एसएससी एमटीएस (सिव्हिलियन) दिल्ली पोलीस भरतीसाठी 7 ते 31 ऑक्टोबर दरम्यान अर्ज.
दिल्ली पोलिसांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS – सिव्हिलियन) भरतीसाठीची परीक्षा, कर्मचारी निवड आयोगामार्फत घेतली जाणार आहे. या भरतीची अधिसूचना SSC द्वारे 7 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली असून ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येतील.
4 ) CISF भर्ती 2022: हेड कॉन्स्टेबल आणि असिस्टंट सब-इन्स्पेक्टर पदांसाठी कुठे आणि कसा अर्ज करावा?
इच्छुक आणि पात्र उमेदवार CISF मध्ये हेड कॉन्स्टेबल आणि ASI च्या भरतीसाठी अधिकृत भर्ती पोर्टल, cisfrectt.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. अर्जादरम्यान, उमेदवारांना त्यांचे नवीनतम फोटो, स्वाक्षरी आणि त्यांच्या कागदपत्रांच्या प्रती अपलोड कराव्या लागतील. त्यासाठी ते स्कॅन करा आणि ते आगाऊ जतन करा. अर्जादरम्यान, उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, रुपे कार्ड, यूपीआय) 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तथापि, उमेदवार एबीआय बँकेच्या चलनाद्वारे फी देखील जमा करू शकतील.