आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा इशारा; जगात वाढतोय मंदीचा धोका !

आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा इशारा; जगात वाढतोय मंदीचा धोका !

 नवी दिल्ली: वाढती महागाई आणि युक्रेन युद्धामुळे जगात मंदीचा धोका वाढत असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. लवकरच त्याचा परिणाम जगावर दिसून येईल. अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर अनेक देश संकटात असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे म्हणणे आहे. 

 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने इशारा दिला आहे की जगभरात मंदीचा धोका वाढत आहे. त्यामुळे आयएमएफ 2023 साठी जागतिक आर्थिक वाढीचा अंदाज पुन्हा एकदा कमी करत आहे.  2026 पर्यंत, जागतिक आर्थिक वाढ चार ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी कमी होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

गुरुवारी जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी येथे एका कार्यक्रमात बोलताना आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा म्हणाल्या की, गोष्टी चांगल्या होण्यापूर्वी आणखी वाईट होण्याची शक्यता आहे. त्या म्हणाल्या की, फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या युक्रेनवरील रशियन आक्रमणाने आयएमएफचा दृष्टिकोन बदलला आहे. आर्थिक आघाडीवर सध्या अनेक देश अडचणीत आहेत.

मंदीचे संकट आणखी गडद होत आहे.

 आयएमएफच्या प्रमुख म्हणाल्या की, अनेक देश आधीच युद्धाचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील याचा अंदाज घेत आहेत.  जॉर्जिव्हा म्हणाल्या की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आधीच तीन वेळा जागतिक वाढीचा अंदाज कमी केला आहे. 2022 साठी 3.2 टक्के आणि आता 2023 साठी 2.9 टक्के वाढ अपेक्षित आहे.

 क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या की, मंदीचे धोके वाढत आहेत. आयएमएफचा अंदाज आहे की जे देश जागतिक अर्थव्यवस्थेत एक तृतीयांश पेक्षा जास्त योगदान देतात त्यांचे आर्थिक आकुंचन या वर्षी आणि पुढील वर्षी सलग दोन तिमाहीत होईल.

वाढलेल्या व्याजदराचा कोणताही परिणाम नाही

 तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना ओपेक प्लसने बुधवारी तेलाच्या किमतीतील घसरण रोखण्यासाठी उत्पादनात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संघर्ष करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का बसू शकतो. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून वाढती महागाई आटोक्यात ठेवण्याच्या आशेने व्याजदरात वाढ केल्याचे परिणाम फारसे चांगले आले नाहीत. मात्र त्यामुळे मंदीचा धोका वाढत आहे. जॉर्जिव्हा म्हणाल्या की, आर्थिक धोरण तीव्र केल्याने अनेक अर्थव्यवस्थांना दीर्घकालीन मंदीमध्ये ढकलले जाऊ शकते. 

CATEGORIES
Share This