हे क्रेडिट कार्ड ग्राहकांना देत आहे प्रत्येक व्यवहारावर 10 टक्के कॅशबॅक !
मुंबई: मोबाईल कंपनी सॅमसंगने आता क्रेडिट सेवेतही पाय पसरण्याची तयारी केली आहे. सॅमसंग इंडियाने ऍक्सिस बँकेच्या सहकार्याने एक क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे जे ग्राहकांना वर्षभरातील सर्व सॅमसंग उत्पादने आणि सेवांवर 10% कॅशबॅक देईल.
ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग आणि ऍक्सिस बँक यांनी व्हिसाद्वारे समर्थित को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी भागीदारी केली आहे. सॅमसंग ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डवरील 10% कॅशबॅक सध्याच्या सॅमसंग ऑफर व्यतिरिक्त EMI आणि नॉन-EMI दोन्ही व्यवहारांवर लागू होईल.
या कार्डची वैशिष्ट्य
सॅमसंग ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना प्रत्येक वेळी सॅमसंग उत्पादने खरेदी करताना कॅशबॅक देते. स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, एसी, वॉशिंग मशीनच्या खरेदीवर ग्राहकांना 10% कॅशबॅक मिळेल. इतकेच नाही तर ग्राहकांनी सॅमसंग सेवा केंद्रांवर या कार्डद्वारे पैसे भरल्यास किंवा विस्तारित वॉरंटी सारखी उत्पादने खरेदी केल्यास त्यांना 10 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. पाइन लॅब आणि बेनो पेमेंट इंटरफेसद्वारे 10% कॅशबॅक दिला जाईल. सॅमसंग उत्पादनांची विक्री करणाऱ्या ऑफलाइन स्टोअरसह Samsung.com, सॅमसंग शॉप ऍप, फ्लिपकार्टवरही ते उपलब्ध असेल. अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Samsung Axis Bank क्रेडिट कार्डवरील कॅशबॅक वर्षभर उपलब्ध असेल.
कार्ड किती प्रकारांमध्ये आहे?
व्हिसा सिग्नेचर आणि व्हिसा इनफिनिट या दोन प्रकारच्या कार्डांमधून निवड करण्याचा पर्याय ग्राहकांना आहे. सिग्नेचर व्हेरियंटवर, कार्डधारकांना 2,500 च्या मासिक कॅशबॅक मर्यादेसह वार्षिक 10,000 कॅशबॅक मिळू शकतो. कार्डधारकांना Infinite प्रकारावर वार्षिक 20,000 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो, तर या कार्डवरील कॅशबॅक मर्यादा 5,000 रुपये प्रति महिना आहे. तुम्ही कितीही खरेदी केली तरीही तुम्हाला 10% कॅशबॅक मिळेल. याव्यतिरिक्त, कार्डधारकांना सॅमसंग इकोसिस्टमच्या बाहेर केलेल्या खर्चावर एज रिवॉर्ड पॉइंट देखील मिळतील.