मर्सिडीज-बेंझ EQS 580 लक्झरी इलेक्ट्रिक कार भारतात लाँच ! 

मर्सिडीज-बेंझ EQS 580 लक्झरी इलेक्ट्रिक कार भारतात लाँच ! 

पुणे:- लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीजने भारतात आपली EQS 580 इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. तिची किंमत 1.55 कोटी रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.  विशेष बाब म्हणजे मर्सिडीजची ही लक्झरी कार भारतातच असेंबल केली जात आहे. त्यामुळे तिची किंमतही बरीच कमी झाली आहे. त्याच वेळी, सध्या ही देशातील सर्वोच्च श्रेणीची इलेक्ट्रिक कार देखील आहे.

 मर्सिडीज EQS 580 इलेक्ट्रिक कारच्या आधी आलेली सर्व मॉडेल्स भारतात आयात करून विकली गेली होती. हाच पॅटर्न कायम ठेवला असता तर या कारच्या देखील किंमती वाढल्या असत्या, परंतु स्थानिक असेंब्लीमुळे भारतात या कारच्या किमती घटल्या आहेत.

EQS 580 ला 857km ची रेंज मिळते

  स्रोतांच्या माहितीनुसार मर्सिडीजच्या EQS 580 इलेक्ट्रिक कारमध्ये 107.8 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक जोडण्यात आला आहे. ही बॅटरी 523hp पॉवर आणि 856Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच, EQS 580 इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 857 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. अशा प्रकारे ही भारतातील सर्वोच्च श्रेणीची इलेक्ट्रिक कार ठरली आहे. कारच्या वेगाबद्दल बोलायचे झाल्यास, या ईव्हीला 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी सुमारे 4 सेकंद लागतात. ही कार 200 kWh अल्ट्रा-क्विक डीसी चार्जर वापरून केवळ 15 मिनिटांत चार्ज केले जाऊ शकते, ज्यामुळे ती 300 किमी पर्यंतची रेंज देते.

  मर्सिडीज EQS 580 ची वैशिष्ट्ये

 Mercedes-Benz EQS 580 इलेक्ट्रिक कार 56-इंचाच्या MBUX हायपरस्क्रीन सारख्या वैशिष्ट्यांसह येते. यात जगातील सर्वात मोठी इन-कार स्क्रीन आहे आणि ती तीन स्क्रीन एकत्र करते. याशिवाय ड्रायव्हर डिस्प्ले, सेंटर इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि पॅसेंजर डिस्प्ले, हाय-एंड बर्मेस्टर म्युझिक सिस्टीम, मसाज सीट्स आणि अँबियंट लाइटिंग सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

CATEGORIES
Share This