पुण्यात ट्राफिक जॅमचा वैताग; मर्सिडीजच्या सीईओंनी आलिशान कार रस्त्यात सोडून पकडला रिक्षा !

पुण्यात ट्राफिक जॅमचा वैताग; मर्सिडीजच्या सीईओंनी आलिशान कार रस्त्यात सोडून पकडला रिक्षा !

पुणे:- तुमच्याकडे करोडो रुपयांची आलिशान कार असेल, दिमतीला मागेपुढे लवाजमा असेल, परंतु ट्राफिक जॅममुळे ती जर जागची हलूच शकत नसेल तर काय उपयोग ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर मर्सिडीजचे सीईओ मार्टिन श्वेंक यांना देखील पुण्यातील ट्राफिक जॅमचा चांगलाच अनुभव आला. 

मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ, मार्टिन श्वेंक यांना शुक्रवारी पुण्यात लक्षात राहील असा अनुभव आला. ऑटोमोबाईल कंपनीचे टॉप बॉस मार्टिन श्वेंक पुण्यातील ट्रॅफिक जॅममध्ये अडकले. शुक्रवारी मर्सिडीजने भारतात आपली EQS 580 इलेक्ट्रिक कार लॉन्च केली. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला जाण्यासाठी मर्सिडीजचे सीईओ लगबगीने घरून निघाले खरे, परंतु पुण्याच्या ट्रॅफिकने त्यांना रस्त्यावर आणले. त्यांची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर त्यांनी आपल्या हाय-एंड कारमधून बाहेर पडून ऑटो-रिक्षा करण्यासाठी काही किलोमीटर चालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना रिक्षा मिळाला अन ते आपल्या कार्यक्रमाला गेले. इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत मार्टिन श्वेंक यांनी लिहिले, “तुमची एस-क्लास पुण्याच्या अप्रतिम रस्त्यांवर ट्रॅफिकमध्ये अडकली असेल तर – तुम्ही काय कराल? कदाचित कारमधून उतरून, काही किलोमीटर चालायला सुरुवात कराल आणि मग रिक्षा पकडाल? या पोस्टला नेटिझन्सकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या. मार्टिन श्वेंकने शेअर केलेल्या फोटोवर कमेंट आणि लाईकचा पाऊस पडला.

 एका नेटिझनने टिप्पणी केली की, “#PerfectDesicionOfCEO🔥🔥👏👏 परिस्थितीनुसार रणनीती बदलावी लागेल👏👏 उत्कृष्ट सीईओ. दुसर्‍या वापरकर्त्याने टिप्पणी केली,” प्रत्येक गोष्टीसाठी बॅकअप प्लॅन असणे आवश्यक आहे. पुणे ट्रॅफिकमध्ये आपले स्वागत आहे.” 

 मर्सिडीजने भारतात आपली EQS 580 इलेक्ट्रिक कार शुक्रवारी लॉन्च केली. तिची किंमत 1.55 कोटी रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे मर्सिडीजची ही लक्झरी कार भारतातच असेंबल केली जात आहे, त्यामुळे तिची किंमतही बरीच कमी झाली आहे. त्याच वेळी, सध्या ही देशातील सर्वोच्च श्रेणीची इलेक्ट्रिक कार देखील आहे.  रेंजच्या दृष्टीने, ही भारतातील आतापर्यंतची सर्वात उच्च श्रेणीची कार आहे, जी एका चार्जवर 857 किमीच्या रेंजचा दावा करते.” 

CATEGORIES
Share This