रॉयल एनफिल्स स्क्रॅम्बलर 650 लवकरच होणार लॉन्च; जाणून घ्या काय असेल खास ?
मुंबई:- भारतीय तरुणाईला रॉयल एनफिल्डची जादू कायम भुरळ घालत आली आहे. तुमचा नवीन रॉयल एनफील्ड बाईक घेण्याचा विचार असेल, तर लवकरच रॉयल एनफील्ड स्क्रॅम्बलर 650 बाजारपेठेत दाखल होत आहे. जाणून घेऊयात तिच्यामध्ये काय खास असेल.
रॉयल एनफिल्ड आज नव्हे तर अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेवर राज्य करत आहे. तिची क्रेझ बहुतांशी तरुणांमध्ये दिसून येते. कंपनी लवकरच रॉयल एनफील्ड स्क्रॅम्बलर 650 भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी जाणून घेऊया या बाईकशी संबंधित काही खास गोष्टी.
डिझाइन आणि लुक
ही मोटारसायकल भारतात चाचणी दरम्यान अनेक वेळा पाहिली गेली आहे परंतु कंपनी एकाच वेळी अनेक बाइक्सवर काम करत आहे. कंपनी आगामी काळात भारतासाठी 650cc स्क्रॅम्बलर मॉडेलसह इतर अनेक 650cc बाईक लॉन्च करू शकते. ही गाडी डिझाइन आणि लूक दोन्हीमध्ये खूपच आकर्षक आहे. यात सिंगल-पीस सॅडल, वायर-स्पोक व्हील, सिंगल अपस्वेप्ट एक्झॉस्ट, राउंड लाइट्स आणि टीअर-ड्रॉप्ससह रेट्रो थीम मिळेल. असे असले तरी बाईकच्या स्टाईलबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, RE 650cc बाईक प्रमाणे, Scrambler 650 ला देखील समान 648cc पॅरलल-ट्विन मोटर मिळेल जी इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल 650 GT सारख्या इतर RE बाईकसह दिली जाते. पीक पॉवर आणि टॉर्क आउटपुट 47 bhp आणि 52 Nm आहे.
गाडीची वैशिष्ट्ये
या गाडीत ड्युअल-डिस्क ब्रेक सेटअप असेल जो मानक म्हणून ड्युअल चॅनल एबीएससह येईल. सस्पेन्शन सेटअपला समोर USD फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल-शॉक शोषक देखील मिळतात. फीचर्स म्हणून, या गाडीमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी, इलेक्ट्रिक स्टार्ट, ट्विन-पॉड इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह ऑफर केले जाईल.