आयपीओ च्या नियमांबाबत सेबी ने केला मोठा बदल !
मुंबई:- आयपीओ च्या नियमांबाबत सेबीच्या बोर्डाने अनेक मोठे बदल केले आहेत. आता आयपीओ जारी करणाऱ्या कंपन्यांना संस्थात्मक गुंतवणूकदारांना शेअर्सच्या किंमतीच्या तपशीलासह खरेदी-विक्रीची किंमत जाहीर करावी लागेल.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने शुक्रवारी प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) प्रकटीकरणाशी संबंधित नियम कडक करण्यासह अनेक बदलांना मंजुरी दिली. त्यानंतर कंपन्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीबाबत अधिक माहिती गुंतवणूकदारांना द्यावी लागेल. नवीन नियमांनुसार, ज्या कंपन्यांनी शेअर बाजारात आयपीओ आणले आहेत त्यांना आता ‘की परफॉर्मन्स इंडिकेटर्स’ (केपीआय) निर्दिष्ट करावे लागतील, जे सध्या कंपन्यांच्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये प्रकाशित केलेले नाहीत. यासोबतच आता IPO आणणाऱ्या कंपनीला शेअर्सच्या किमतीचा तपशीलही जाहीर करावा लागणार आहे.
आयपीओ बाबत सेबी आता कठोर
शुक्रवारी झालेल्या सेबीच्या बोर्डाच्या बैठकीत आयपीओशी संबंधित नियमांबाबत अनेक निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये आता आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांना लिस्टमध्ये 18 महिने आधी शेअर्स खरेदी-विक्रीची परवानगी द्यावी, तसेच कोणत्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर्स कोणत्या किंमतीला विकत घेतले आणि विकले याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल
नव्या युगातील कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान केले.
IPO नियमांमध्ये बदल अशा वेळी आला आहे जेव्हा पेटीएम, झोमॅटो आणि पीबी फिनटेक सारख्या नवीन युगातील कंपन्यांचे शेअर्स काही काळामध्ये त्यांच्या IPO किंमतीपेक्षा खूप खाली गेले आहेत. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी सांगितले की, नवीन युगातील तंत्रज्ञान कंपन्या आणि तोट्यात असलेल्या कंपन्यांना एकाच आर्थिक स्तरावर तोलता कामा नये. पुढे त्या म्हणाल्या की कंपन्या खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांसोबत ‘की परफॉर्मन्स इंडिकेटर’ शेअर करतात. नवीन नियमांनंतर, कंपन्यांना आता ते किरकोळ गुंतवणूकदारांसोबतही शेअर करावे लागणार आहेत. याद्वारे गुंतवणूकदारांना कंपनीची संपूर्ण माहिती मिळू शकेल.